
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका भयानक अपघात घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ३३ वर्षीय प्रदीप कुमारचा जीव गेला. प्रदीप दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. त्याने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्त्यावर खोल खड्ड्यांमुळे दुचाकीचा तोल गेला. तो रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडला गेला. याचा त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.