Viral Video : कासवाने खोडकर कुत्र्याला १० सेकंदांत शिकवला 'असा' कायमचा धडा, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

Dog Turtle Video : कासवाची पकड इतकी मजबूत होती की, कुत्रा स्वतःची सुटका करू शकत नाही. हा व्हिडिओ @pki42 या युजरने ट्विटरवर शेअर केला असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर तसेच धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Viral Video : कासवाने खोडकर कुत्र्याला १० सेकंदांत शिकवला 'असा' कायमचा धडा, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित
Updated on

कुत्रा जगातील सर्वात खोडकर प्राण्यांपैकी एक आहे असे मानले जाते. तो कधीही कोणाला त्रास देण्याची संधी सोडत नाहीत. पण असा खोडकरपणा कुत्र्‍याच्या अंगलट येतो आणि गंभीर संकटात सापडतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो सर्वांनाच धक्का देतो. या व्हिडिओमध्ये, एक कुत्रा कासवाला डिवचताना दिसतो, परंतु नंतर कासव त्या खोडकर कुत्र्याला असा धडा शिकवते ज्यावर पाहणारे विश्वास ठेवू शकत नाहीत. कासवांना अनेकदा निष्पाप मानले जाते, परंतु ते किती धोकादायक असू शकतात हे या व्हिडिओमध्ये दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com