

मुक्या प्राण्यांची आणि माणसांच्या मैत्रीच अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहतो. कुत्रा ईमानदार प्राणी आहे इतर पाळीव प्राणी देखील माणसांवर आपली निष्ठा कायम ठेवत असल्याचेही आपण पाहिले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका म्हशीने आपल्या मालकाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. या म्हशीच्या निष्ठेचे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. मालकासाठी त्याच्या नातेवाईकाने देखील जे केले नसते ते या म्हशीने करुन दाखवले आहे.