

A biker accidentally runs over a king cobra, triggering a sudden retaliatory strike captured on video.
esakal
असं म्हणतात की साप कधी स्वत:हून कोणाला चावत नाही. अनेकदा लोक सापाची खोड काढतात किंवा त्याला असुरक्षित वाटेल असे वर्तन करतात तेव्हा तो स्वरक्षणासाठी प्रतिहल्ला करतो. सोशल मीडियावर सध्या अशाच एका कोब्राच्या बदल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटिझन्समध्ये खळबळ आहे.या व्हिडिओमध्ये एका संतप्त कोब्राने एका तरुणावर दुचाकीने चिरडल्यानंतर बदला घेतल्याचा क्षण कैद झाला आहे.