Video : पाण्यात वाहून जाणाऱ्या हरणाच्या समोरच उभा होता मृत्यू, तरुणाने देवदूत बनून क्षणात वाचवले प्राण; हृदयस्पर्शी व्हिडिओ

Brave Man Saves Deer : सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. वेगाने वाहणाऱ्या कालव्याच्या पाण्यात एक हरीण अडकून जीवासाठी झुंजत होते. पुढे लोखंडी सळ्या आणि खोल नाला असल्याने हरणाचा जीव जाण्याची शक्यता होती.
Video : पाण्यात वाहून जाणाऱ्या हरणाच्या समोरच उभा होता मृत्यू, तरुणाने देवदूत बनून क्षणात वाचवले प्राण; हृदयस्पर्शी व्हिडिओ
Updated on

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे आनंदाने भरुन येतील. व्हिडिओमध्ये एका माणसाने एका हरणाला कालव्याच्या पाण्यातून वाहून जाण्यापासून कसे वाचवले हे दाखवले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला दिसते की, एक हरीण कालव्यातून वेगाणा जाणाऱ्या पाण्यातून वाहून जात आहे. ते जीव वाचवण्यासाठी खूप धडपडत आहे, पण त्याला यश येत नाही, मृत्यू अगदी समोरच असतो. पण तरुण देवदूत बनून येतो आणि त्याला जीवदान देतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com