A touching scene where a gorilla gently returns a baby to its mother, showcasing a rare moment of empathy and love that captivated millions on the internet.
esakal
Trending News
Viral Video : हृदयस्पर्शी व्हिडिओ ! ममतेची मूर्ती आहे हा गोरिला, आईकडे मूल सोपवून जिंकली लाखो लोकांची मने
Trending Video : महिला मुलाला उचलते आणि हसायला लागते आणि मुलाला कडेवर घेते ती गोरिलाकडे पाहते आणि त्याचे आभार मानते. सोशल मीडियावर लोकांना गोरिलाचा हा व्हिडिओ खूप आवडतो आहे. लोक गोरिलाचे खूप कौतूक करत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला तिच्या लहान मुलाला घेऊन प्राणीसंग्रहालयात भेट देण्यासाठी आली आहे. ती महिला तिच्या मुलाला गोरिलाला राहण्यासाठी बनवलेल्या कुंपणाकडे काही वेळ उभे करते. गोरिलाची नजर त्याच्या कुंपणातील लहान मुलावर पडताच, तो हळू हळू त्याच्याकडे येतो, जणू काही तो मुलाला घाबरवू नये म्हणून प्रयत्न करत आहे.