90's Romance : ऐसी भी एक लव स्टोरी! ना व्हॉट्सॲप ना मेसेज, 22 वर्षे वाट पाहिली अन् आता...

प्रपोज डे च्या निमित्तानं ही इंटरेस्टिंह लव्ह स्टोरी जाणून घेऊया
90's Romance
90's Romanceesakal

Viral Love Story & 90's Romance : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु असल्याने सगळीकडे गुलाबी प्रेमाचं वातावरण दिसून येतं. कित्येक नवी नाती या वीकमध्ये नात्यात गुंततात, प्रेम व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रेमाप्रती असलेल्या भावनादेखील. जगात अशा फार प्रेम कथा प्रसिद्ध आहेतच. पण एक लव्ह स्टोरी अशीही. ज्यांनी एकमेकांना फक्त दुरून बघत 22 वर्षे काढली. प्रपोज डे च्या निमित्तानं ही इंटरेस्टिंह लव्ह स्टोरी जाणून घेऊया.

या जोडप्याचा हा 90 च्या दशकातील रोमांस होता. ते वर्ष होतं 1998. सोनिया रतन आणि संजय रतन यांची ही लव्ह स्टोरी आहे. ती पहिलीच वेळ होती जेव्हा सोनिया यांनी रतन यांना सायकलवर त्यांच्या काही मित्रांसोबत पहिल्यांदा बघितले. मात्र तेव्हा सोनिया यांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र संजयसाठी ते पहिल्या नजरेतील प्रेम होतं.

ना व्हॉट्सअॅप ना मॅसेज...

कॉलेजला जाताना सोनियाची एक झलक बघण्यासाठी संजय कॉलेजच्या रोडवर उभे राहायचे. अगदी 90 च्या सिनेमांप्रमाणे. एके दिवशी हिंमत करून सोनिया यांनी त्यांच्या वडिलांना संयबाबत सांगितले. मात्र त्यांच्या वडिलांनी साफ विरोध केला व म्हणाले, " जेव्हा तुझ्यासाठी तो घर बांधून देईल त्या दिवशी मी तुझं त्याच्याशी लग्न लावून देईल."

वर्षे जात होती आणि सोनिया याचं वयही वाढत होतं. त्यांच्या भावाच्या दोन मुलांची काळजी त्यांचा भाऊ घेत नसे. म्हणून त्यांच्या भाच्यांना त्यांनी सांभाळायचं ठरवलं. यात वर्षे कशी निघून गेली कळलं सुद्धा नाही. सोनिया यांचे वडील मात्र त्यांना कायम सांगत होते की तुझं लग्नाचं वय झालंय, लग्न करुन घे. मात्र सोनिया यांचा जीव संजय यांच्यात अडकला होता.

वडिलांचं आग्रह करता करता वय झालं आणि त्यांचे निधनही झाले. त्यावेळी मात्र सोनिया एकट्या पडल्या. याच त्रासातून जात असताना अचानक त्यांची भेट एकदा संजय यांच्याशी झाली. त्यावेळी त्यांचेही अजून लग्न झालेले नाही हे त्यांना माहिती नव्हतं. सोनियाचा प्रवास ऐकल्यानंतर संजय यांनी वर्षोवर्ष जपून ठेवलेल्या भावना अखेर सोनियपुढे व्यक्त केल्या आणि लग्नाची मागणी घातली. (Love Story)

अखेर 22 वर्षांची वाट बघितल्यानंतर अचानक झालेल्या भेटीतून दोघांनाही त्यांचं नव्वदीतलं प्रेम मिळालं. फार प्रतिक्षा झाली खरी मात्र दोघांनाही सुखाने नांदण्याची संधी मिळाली.

वय झालं तरी प्रेम तरुण असतं. या जोडप्याच्या लव्ह स्टोरीतून ते प्रकर्शाने जाणवतं. आज हे जोडपं त्यांचा सुखी संसार करताय. त्यांच्या लव्ह स्टोरीचं गोष्ट सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आहे. (Valentine Week)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com