

kanpoor viral story
esakal
कानपूर शहरातील अहिरवा परिसरात पानाची दुकान चालवणाऱ्या अभिषेक यादव (वय २५) या तरुणाने पत्नीला भेट म्हणून सोन्याची चेन घेण्यासाठी जवळपास एका वर्षभर २० रुपयांची नाणी जमा केली. छोट्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात घरखर्च भागवताना अभिषेकने हळूहळू सुमारे एक लाख रुपये एवढ्या किंमतीची नाणी वेगळी ठेवली. अखेर ही नाणी घेऊन तो स्थानिक सराफा दुकानात गेला. या घटनेची चर्चा सध्या सामाजिक माध्यमांवर होत आहे.