Viral Post : बायकोने घरातील खोलीला बनवले ऑफिस; पती म्हणाला, पगारातील दे हिस्सा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Post

Viral Post : बायकोने घरातील खोलीला बनवले ऑफिस; पती म्हणाला, पगारातील दे हिस्सा!

Viral Post : सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील काही गोष्टी विचार करायला लावण्याऱ्या असतात.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Viral Video : असाही लपंडाव; गोड कुत्रा अन् मालकीणीचा डाव रंगला

अशाच एका गोष्टीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये संबंधित महिलेकडे पतीने पगारातील ३० टक्के हिस्सा मागण्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा: Corruption Viral Video : पैशाची भूक! चक्क सबइंस्पेक्टरच्या तोंडातून काढले पैसे...

त्याचे झाले असे की, सध्या एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये महिलेने घरातील एका खोलीत ऑफिस सुरू केल्याने पतीने तिच्याकडे पगाराच्या 30 टक्के रक्कम मागितली.जी देण्यास महिलेने नकार दिला. याबाबत 32 वर्षीय पत्नीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.

हेही वाचा: Viral Video : अरे देवा याला काय म्हणायचं, संसार सुरू होण्याआधीच फोडलं एकमेकाचं डोकं

पोस्टमध्ये पत्नी लिहिते की, आमचं लग्न होण्यापूर्वीच पतीने दोन बेडरूमचे घर घेतले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी पत्नीला नोकरी लागली. हे काम वर्क फ्रॉम होते. त्यामुळे संबधित महिला घरून काम ककत होती. यासाठी तिने घरातील एका रिकाम्या खोलीचे रुपांतर ऑफिमध्ये केली.

मात्र, आता महिलेच्या पतीने घरातील एका खोलीचा वापर ऑफिस म्हणून केल्याने भाड्यापोटी पगारातील ३० टक्के रक्कम मागत आहे. याबाबत संबंधित महिलेने Reddit वर एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा: Viral Video : लग्नात बापलेकीनं वऱ्हाडी मंडळींना नाचवलं; 'तेरा नशा'वर भन्नाट डान्स

दरम्यान, रेडिटवर महिलेले टाकलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, अनेक यूजर्स महिलेला सल्ला देताना दिसून येत आहे. यामध्ये काहींनी घर सोडण्याचा तरस काहींनी पतीला पैसे न देण्याचा सल्ला दिला आहे.