Viral: शाब्बास! शारीरिक सुख नाही तर शांततेच्या शोधात पठ्ठयाने ४३ वर्षात केले ५३ लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man marry 53 times in 43 years age

Viral: शाब्बास! शारीरिक सुख नाही तर शांततेच्या शोधात पठ्ठयाने ४३ वर्षात केले ५३ लग्न

Viral News: लग्न हा जीवनातील एकदाच होणारा भव्य सोहळा मानला जातो. त्यामुळेच लग्नाचा सोहळा थाटामाटातच पार पाडला जातो. काही लग्नांबाबत मात्र हा थाटात पार पडलेला सोहळा नंतर मनस्ताप होतो. अनेकजण झालेला मनस्ताप दूर करण्यासाठी लग्नातून सुटका करत घटस्फोटही घेतात. मात्र या पठ्ठ्याने चक्क मनशांतीसाठी ४३ वर्षात तब्बल ५३ वेळा लग्न केले आहेत. (Man marry 53 times in 43 years age)

सौदी अरेबियातील (Saudi Arabia) एका व्यक्तीने 43 वर्षांत 53 वेळा लग्न करण्याचा विक्रम केला आहे. इतके लग्न करण्यामागचं कारणही या व्यक्तीने सांगितलं आहे. त्याने शांततेच्या शोधात 53 वेळा लग्न केलं. तसेच शारिरीक किंवा वयक्तिक सुखासाठी नाही तर मनाच्या शांतीसाठी या पठ्ठ्याने ५३ वेळा लग्न केल्याचा दावा केलाय.

या व्यक्तीने पहिल्यांदा लग्न केले तेव्हा त्याचे वय २० वर्षे होते. तर त्याची पत्नी त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती. अबू अब्दुल्ला असे या व्यक्तीचे नाव आहे. पुढे तो म्हणतो, "जेव्हा मी पहिल्यांदा लग्न केले, तेव्हा एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. कारण तेव्हा मला आरामदायक वाटले आणि मला मुले झाली." मात्र, काही वर्षांनी नात्यात अडचणी निर्माण झाल्या आणि अब्दुल्ला यांनी वयाच्या 23 व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: Viral Video : पोलीस पत्नी आणि महिला कर्मचारी यांच्यात धरपकड, व्हिडीओ व्हयरल

प्रत्येक वेळी लग्न करण्यामागे चांगली पार्टनर स्त्री शोधणे हा एकच हेतू होता. मात्र प्रत्येक वेळी त्याला चांगली पार्टनर शोधण्यात यश मिळालं नाही. या व्यक्तीचं सगळ्यात कमी काळ टीकणारं लग्न होतं ते एका रात्रीचं. त्याने परदेशातील व्यवसायिक प्रवासादरम्यान विदेशी महिलांशीही विवाह केल्याचे मान्य केले आहे.

Web Title: Viral News Man Married 53 Times At The Age Of 43 His Marriages News Viral On Social Media Saudi Arabia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..