

गर्भवती महिला कर्मचाऱ्याला 'वर्क फ्रॉम होम' नाकारणे आणि कामावरु काढून टाकणे एका कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेला एक कोटीची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बर्मिंगहॅममधील रोमन प्रॉपर्टी ग्रुप लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या पॉला मिलुस्का यांनी गरोदरपणाशी संबंधित समस्यांमुळे घरून काम करण्याची परवानगी मागितली होती. पण कंपनीने पॉलाला याची परवानगी दिली नाही उलट तिला नोकरीवरून काढून टाकले.