
सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर खूप सामान्य झाला आहे. प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे आणि इंटरनेट पॅक देखील स्वस्त आहे, त्यामुळे लोक सोशल मीडियाचा खूप वापर करत आहेत. लहान मुले देखील सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसून येतात.
जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुम्ही एका दिवसात अनेक वेगवगळे व्हिडिओ पाहत असाल. काही व्हिडिओ पाहिले की असे वाटते की लोक रीलसाठी किती वेडे झाले आहेत. अनेक लोक रीलसाठी आपला जीवही धोक्यात घालतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी दिसत आहे.