
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एका शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला शिक्षिका वर्गात मुलांना शिकवण्याऐवजी केसांना तेल लावताना आणि केसांत कंगवा फिरवताना दिसत आहे. त्याच वेळी, मुले बेंचवर शांतपणे बसलेले दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, कारवाई करण्यात आली आणि शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील एका शाळेतील असल्याचे सांगितले जात आहे.