
Baby elephant crying viral clip: सोशल मिडियावर विविध प्राण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील आहे. हा हत्तीचा पिल्लू आईपासून दूर झाला असून तो इकडे तिकडे मदत मागताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे.