Viral Video : अरे देवा! मुलाने आपल्या पहिल्या बंबल डेटला आईला नेलं सोबत, पुढे जे झालं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : अरे देवा! मुलाने आपल्या पहिल्या बंबल डेटला आईला नेलं सोबत, पुढे जे झालं...

Boy takes his mom to meet Bumble date viral video : सध्या सोशल मीडियामुळे लोक आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहचवत असातात. तर काही लोक व्हायरल करण्यासाठी काहीही करत असतात. त्यामुळे व्हायरल व्हीडिओच सध्या पेवच फुटलं आहे. अशाच व्हायरल मधून जगात किती प्रकारचे लोक काय काय तऱ्हा करत असतात ते समजतं.

सिध्देश लोखरे नावाच्या एका मुलाने बंबल डेट नावाच्या एका ॲपवरून एका मुलीला भेटायला बोलावले. त्या मुलीला पहिल्यांदाच भेटायला जाताना या पठ्ठ्याने चक्क आईला सोबत नेलं. मग काय, पुढे जे काही झालं ते त्या मुलालाही अपेक्षित नव्हतं.

अंत भला तो सभ भला अशी म्हण तुम्ही ऐकली असेलच. तसंच काहीसं आता या मुलाच्या बाबत म्हणावं लागेल. डेटवर खरतर गेला होता मुलगा. पण त्या मुलीची आणि सिध्देशच्या आईची काही वेळातच एवढी चांगली ओळख झाली की, दोघीच गप्पा मारत बसल्या आणि मुलगा बाजूलाच राहिला.

टॅग्स :viral video