
गोवा : सोशल मीडियावर सध्या कुठला व्हिडिओ व्हायरल होईल आणि त्याची चर्चा सुरु होईल काही सांगता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओची खासियत अशी आहे की, एका तरुणाला सिगारेट पिण्याची तल्लफ झाली होती.
पण त्याच्याकडं ती शिलगवण्यासाठी माचिस किंवा लायटर नव्हतं. पण त्यानं लायटर मिळावं अशी इच्छा व्यक्त केली अन् चक्क गोव्यातील आकाशातून एक देवमाणूसच अवतरला. या माणसानं त्या तरुणाला लायटर दिल आणि तो पुन्हा निघून गेला.