
bjp gujarat
esakal
गुजरात भाजपसाठी लाजिरवाणा असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भरूच जिल्ह्यातील आमोद नगरपालिकेच्या अध्यक्षा जल्पा पटेल यांचा हा व्हिडिओ आहे. गुजरातमध्ये १५ दिवसांचा स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम राबवला जात आहे. पहिल्या दिवशी स्वच्छतेसाठी एक मैदान निवडण्यात आले. मात्र, आधी मैदानावर कचरा टाकून नंतर साफसफाई करण्याची पद्धत वापरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.