
Viral Video: सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हैदराबादमधील पीव्ही नरसिंह राव एक्सप्रेसवेवर एक मद्यधुंद माणूस उंटावर जाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उंटाच्या मागून कार आणि बाईक जात असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने उंटाचा आणि महामार्गावरील माणसाचा पाठलाग केला आणि त्याला थांबवले.