
वडील आपल्या मुलांसाठी हिरो असतात. तुम्हीही अशा गोष्टी ऐकल्या असतील. पण एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये वडिलांनी हे सिद्ध केले आहे. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे वडील आणि मुलगी डिस्ने क्रूझवर जात होते. यादरम्यान, पाच वर्षांची मुलगी निष्काळजीपणामुळे समुद्राच्या पाण्यात पडते. त्यानंतर, वडील विचार न करता पाण्यात उडी मारतात आणि कसलीही पर्वा न करता मुलीला वाचवतात.