
आजकाल व्हिडिओ आणि रील्सचे युग आहे. लोक तासन्तास रील्स पाहण्यात घालवतात. यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पालकांच्या पालकत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एक युवक आपल्या मुलाला सिंहासोबत फोटो काढायला भाग पाडत आहे. तो आपल्या मुलाला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मूल रडू लागते, तरी तो त्याला जबरदस्तीने सिंहाच्या पाठीवर बसयला भाग पाडतो. ज्यामुळे लोक आता त्या तरुणाला लक्ष्य करत आहेत.