Viral Video : डॉटर्स ऑफ द इयर! वडिलांना बक्षीस मिळालं अन् लेकींच्या डोळ्यात आलं पाणी, चिमुकलीचा व्हायरल व्हिडिओ पाहा

Father daughter emotional moment viral video : एक हृदयस्पर्शी क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्पर्धेत बाबांना बक्षीस मिळाल्यानंतर त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत आहेत.
Viral Trending Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Trending Video: जगातील प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा पहिला सुपरहिरो असतो. तिचे हक्काचे आश्रयस्थान म्हणजे तिचे वडील. बालपणापासून बाबांसोबत घडणाऱ्या आठवणी आयुष्यभर मनात घर करतात. असाच एक हृदयस्पर्शी क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्पर्धेत बाबांना बक्षीस मिळाल्यानंतर त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओचा भावनिक क्षण

व्हिडीओमध्ये बाबा बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. स्पर्धेत विजयी ठरल्यानंतर त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाते. यावेळी स्टेजवर त्यांच्या दोन्ही मुलींना बोलावले जाते. बक्षीस मिळताच मुलींच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो, पण त्याचबरोबर डोळ्यात अश्रूंनी एक वेगळीच भावना उमटते. बाबांच्या कष्टाचे फळ मिळताना पाहून त्या अश्रूंना वाट मोकळी होते.

बक्षीस वितरणावेळी प्रेक्षक टाळ्या वाजवतात, फोटो काढले जातात. पण या क्षणाने भारावलेल्या मुली डोळ्यातील अश्रू लपवू शकत नाहीत. बाबा त्यांचा हात धरून त्यांना आधार देतात, तर आई त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसते. व्हिडीओचा हा शेवट प्रत्येक प्रेक्षकाला भावूक करणारा आहे.

Viral Trending Video
Sunita Williams : सुनिता विल्यम्सना अंतराळात सतावणाऱ्या 'त्या' घाण वासाचं रहस्य उलगडलं; अंतराळवीरांना श्वास घेणंही झालं होतं अवघड

नेटकऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “वडिलांना बक्षीस मिळताच मुलगी रडू लागली.” व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मुलींच्या बाबांवरील प्रेमाचे आणि त्यांच्या भावनिक प्रतिक्रियेचे कौतुक केले आहे.

Viral Trending Video
Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

मुलींसाठी विशेष क्षण

आपण एखाद्या गोष्टीत जिंकल्यावर आपले आई-बाबा जेवढे आनंदी होतात, त्याहून जास्त आनंद आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी खास करताना मिळतो. या व्हायरल व्हिडीओने हेच दाखवून दिले आहे की, बाबांच्या यशात मुलींसाठीही एक अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण सामावलेला असतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले असेल, नाही का? बाबांचे आणि मुलींचे नाते असेच हृदयाला भिडणारे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com