Viral Video : ऐतिहासिक वास्तूंचा अपमान करणाऱ्यांना शिकवला धडा, आपण सुद्धा शिकलं पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : ऐतिहासिक वास्तूंचा अपमान करणाऱ्यांना शिकवला धडा, आपण सुद्धा शिकलं पाहिजे

Viral Video : जेंव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जातात मग ते देशातील असो किंवा परदेशातील त्याचं पावित्र्य आणि महत्व राखणं हे तुमचं कर्तव्य असतं. पण काही लोकांना हा कॉमन सेंस नसतो. ते आपल्या बेजाबादार आणि भावनेच्या भरात केलेल्या कृतीने त्या वास्तूचा अवमान करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

चिचेन इत्झा येथील मायां पिरॅमिडवर फिरायला गेलेली एक मेक्सिकन महिला चढली. तिच्यासाठी तो उंच पिरॅमिड चढणं हा थरार असावा कदाचित, म्हणून वर जाऊन त्या धोकादायक ठिकाणी ती बेजबाबदार पणे नाचतानाही दिसत आहे.

पण तिथल्या स्थानिक लोकांच्या त्यांच्या पवित्र वास्तूवर असं चढून जाणं आवडलं नाही. सर्वांनी एकत्र येत त्या महिलेचा निषेध केला. तिला ताबोडतोब खाली उतरवण्यात आलं. सर्वांनी घेराव घालत तिचा निषेध केला. एकाने तर पाण्याची बाटली तिच्यावर रिकामी केली.

शेवटी शरमेने मान खाली घालून ती महिला तिथून निघून घेली. तिच्या या कृत्याचा निषेध करतच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या धार्मिक, ऐतिहासिक वास्तूंचा प्रत्येकालाच अभिमान असायला हवा.

टॅग्स :viral video