
Viral Video : ये दिल मांगे मोअर, अख्खं वऱ्हाड जेवतंय मोराच्या ताटात, व्हिडीओ भन्नाट व्हायरल
Viral Video : लग्न समारंभ म्हटलं की पाहुण्यांची वर्दळ आणि वऱ्हाड्यांचा मानपान हा असतोच. त्यातल्या त्यात वऱ्हाड्यांना चांगलं खायला प्यायला घालणं आणि त्यांना खूश करणं हा प्रत्येक लग्नघरच्या कुटुंबियांचा मुख्य हेतू असतो. चुकून ही मंडळी नाराज झाली तर मुलीला आयुष्यभर सासरच्यांचे टोमणे खावे लागतील असे म्हटले जाते.
सध्या सोशल मीडियावर वऱ्हाड्यांच्या जेवणाचा एक व्हिडीओ भन्नाट व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्हाला वऱ्हाडी मोराच्या ताटात जेवताना दिसतील. अतिशय उत्तम मेजवाणी असल्याचे दिसून येते. जवळपास दोनशे लोकांची पंगत होती. आणि प्रत्येकाला पद्धतशीर मोराच्या ताटात जेवायला वाढलेले होते. हा राजेशाही थाट बघणारे बघतच राहिले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या भन्नाट व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघणाऱ्यांनी या क्रिएटीव्ह पंगतीची आयडीया ज्याला सुचली त्याचं कौतुक केलंय तर काहींनी शेवटी खायचंच आहे ना मग मोराचं ताट कशाला असं म्हणत टोमणे सुद्धा मारलेत. मात्र लग्नसमारंभातील ही जेवणाची पंगत अगदी आगळीवेगळी होती यात वाद नाहीच.
सोशल मीडियावर बरेच लग्नसमारंभातील व्हिडीओ व्हायरल होत असतात. तरुणांमध्ये असे व्हिडीओज भन्नाट शेअरही केले जातात. मात्र सोशल मीडियावरील काही व्हिडीओज हे फार आगळे वेगळे असतात. हा व्हिडीओ देखील त्यातलाच एक आहे.
डॉ. मधू तेकचंदानी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला पाच लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत, तसेच या व्हिडीओला लाइक्सही भरपूरही आहेत. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा दिसून येते.