
Girl slips while shooting Instagram reel at train door: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चालत्या ट्रेनच्या दारावर उभी राहून रील बनवताना एक तरूणी घसरून पडते.
ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या दाराशी उभे राहून रील बनवणे किती जीवघेणे असू शकते हे स्पष्टपणे दिसून येते.
कारण असं केल्यानं तुम्हाला स्वस्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळू शकतात. परंतु जीवाला धोका कायम आहे. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, एक तरूणी स्टंट करतांना दिसत आहे.