
सरकारी शाळेतील शिक्षकाने ‘देश रंगीला’ गाण्यावर मुलांसोबत नृत्य करत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
शिक्षकांचा उत्साह आणि मुलांचा निरागस सहभाग यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
लोकांनी शिक्षकाला ‘डान्सिंग टीचर ऑफ इंडिया’ म्हणत कौतुक केले आहे.
Trending Dance Video : स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात देशभरात अनेक कार्यक्रम रंगले, पण एका सरकारी शाळेतील शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसोबत सादर केलेल्या नृत्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘देश रंगीला’ या गाण्यावर गुरुजींनी लहान मुलांसोबत केलेला ठेका पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. हा व्हिडिओ इतका आकर्षक आहे की तो पाहताना शिक्षकांचा उत्साह आणि मुलांचा निरागसपणा मनाला भुरळ घालतो.