Viral Video : बँकेत पेन्शन घेताना वृद्धाला हृदयविकाराचा झटका, पैसे मोजण्याआधीच संपले जीवन, हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद

Pensioner Death Hapur : कॅश काउंटरवर उभे असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. ते अडखळून खाली पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Viral Video : बँकेत पेन्शन घेताना वृद्धाला हृदयविकाराचा झटका, पैसे मोजण्याआधीच संपले जीवन, हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद
Updated on: 

उत्तर प्रदेशातील हापूर येथून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेत एका वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. असे वृत्त आहे की, ६५ वर्षीय अशफाक हे पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या कॅश काउंटरवर उभे असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना बँकेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com