राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान या निर्णयाला राजकीय क्षेत्रातून विरोध होताना पहायला मिळतोय. राज्यातील लोकांनी सुद्धा या सक्तीबाबत संताप व्यक्त केलाय. दरम्यान या सगळ्यात एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.