
Viral video of old couple in train applying nail polish: वाढत्या वयानुसार प्रेम कमी होते का? हा प्रश्न उपस्थित होतो कारण सध्या सोशल मिडियावर एका आजी-आजोबांचा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुमचा प्रेमावरील विश्वास नक्कीच दृढ होईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेमाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलेल.
काळाच्या ओघात प्रेमाचा रंग अधिकच गडद होत जातो. सध्या सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरत असलेल्या व्हिडिओमुळे काहीही न बोलता ही वस्तुस्थिती सिद्ध झाली आहे. या व्हिडिओत एक वृद्ध जोडपे एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेताना आणि एकमेकांसोबत खास क्षण जगताना दिसत आहे.