

Crocodile Viral Video
Sakal
Crocodile Viral Video: सोशल मीडियावर एका मगरीचा आणि एका वृद्ध माणसाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो वृद्ध माणूस उद्यानात फिरत असताना अचानक एक मगर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. मगरीचे तोंड उघडे असते, ते खूपच आक्रमक दिसते. परंतू तो माणूस घाबरलेला नाही. त्याच्या हातात आधीच एक फ्राय पॅन होते. मगर जवळ येताच तो त्यावर जोरात हल्ला करतो. हा व्हिडिओ सर्वांनाच विचारात पाडतो की इतक्या धोकादायक प्राण्याचा सामना कसा होऊ शकतो. तसेच या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.