

सोशल मीडियावर काय समोर येईल हे सांगणे अशक्य आहे. सध्या एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने जेवताना काचेची बाटली चावली. त्याने ही काचेची बाटली भाजी अन् भाकरीसारखी चावून खाल्लीय त्या माणसाचा व्हिडिओ पाहिणारे प्रत्येकजण स्तब्ध झाले. या दृश्यावर युजर्स उत्साहाने प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.