
Mother and baby yoga video goes viral on social media: सोशल मिडियावर अनेक विचित्र, भावनिक तर काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आज देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. सोशल मिडियावर योगा करतांनाचे अनेकांनी व्हिडिओ शेअर केले आहेत. पण सध्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांना मनं जिंकली आहे. कारण या व्हिडिओत एक आई आपल्या ४ महिन्याच्या गोंडस बाळासोबत योगा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.