Viral Video Of ACP : खाकी वर्दीला सलाम ! ड्रायव्हरची तब्येत बिघडल्यामुळे ACP ने चालवली बस, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये ड्रायव्हर अचानक आजारी पडल्याने एसीपी बस चालवताना दिसताय
Viral Video Of ACP
Viral Video Of ACPesakal

Viral Video Of ACP : सोशल मीडियाच्या माध्यामातून दिवसभरात बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. सकारात्मक आदर्श जगापुढे मांडणारे हृदयस्पर्शी व्हिडिओ यूजर्स लगेच एकमेकांन शेअर असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर अचानक आजारी पडल्याने एसीपी बस चालवताना दिसताय.

कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये सोमवार आणि मंगळवारी विरोधी पक्ष नेत्यांची महाबैठक होती. त्यामुळे सगळ्या रस्त्यांवर VVIP लोकांचा ताफा होता. प्रशासनाने रस्त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस बी रामचंद्र यांना दिली होती.

ड्यूटीदरम्यान सोमवारी जेव्हा एसीपी रामचंद्र यांनी बघितले की एक ड्रायव्हर फार आजारी आहे. तेव्हा त्यांनी कुठलाही विचार न करता तातडीनं त्याला मदत केली. त्यांनी फक्त त्या ड्रायव्हरला रूग्णालयात भर्तीच केले नाही तर ड्रायव्हरऐवजी स्वत:च राज्य ट्रान्सपोर्ट बस चालवू लागले. त्यांच्या या उदार व्यक्तीमत्वाचं सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

व्हिडिओमध्ये एसीपी रामचंद्र बस चालवताना दिसताय. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या यूजरने लिहीलेय की, दयाळूपणा, कर्तव्य, करुणा आणि आदर दाखवत केलेल्या तुमच्या या छोट्याशा कार्याला सलाम. या व्हिडिओ शेअर झाल्यापासून बस चालवणाऱ्या एसीपी रामचंद्र यांचं सगळीकडे कौतुक सुरू आहे. (viral Video)

Viral Video Of ACP
Viral Video : 'भीती राहिली कुठं'? दिल्लीच्या जोडप्याने हद्दच केली राव!

या प्रकरणाची माहिती देताना एसीपी रामचंद्र म्हणाले की, “आम्ही ताबडतोब ड्रायव्हरला अॅम्ब्युलन्समध्ये बोअरिंग हॉस्पिटलमध्ये हलवले आणि बसमुळे रहदारीची समस्या निर्माण होत असल्याने मी बस एक किलोमीटरहून अधिक चालवली आणि बीएमटीसी बस शेल्टरला पार्क केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com