Viral Video : यशराज मुखाटेचा 'मच्छर रॅप' होतोय व्हायरल..ऐकून हसू आवरणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : यशराज मुखाटेचा 'मच्छर रॅप' होतोय व्हायरल..ऐकून हसू आवरणार नाही

Yashraj Mukhate Viral Rap: पारंपारिक ध्वनीला रंजक अंदाजात बदलणारा कलाकार म्हणून यशराज मुखाटे ओळखला जातो. त्याचे अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच त्याने मच्छर रॅप गात नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साला मच्छर हे त्याचं रॅप साँग सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतेय. त्याचं हे रॅप ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

काय म्हणतं यशराज मुखाटेचं मच्छर रॅप वाचा

सहज एका ध्वनीमधून यशराजला हा मच्छरचा आवाज असल्याचा भास झाला त्याने त्याची क्रिएटीवीटी वापरत भन्नाट मच्छर रॅप गायलं.

एकदा बघा अन् वाचा भन्नाट व्हायरल साँग

कानात कुई कुई करत सगळ्याची झोप मोड करतो, सगळ्यात यूजलेस आणि फालतू हा क्रिएचर..

चावण्याशिवाय याचं नाही दुसरं फिचर..

चावून चावून किती रक्त पिशील.. शेवटी दहा दिवसांच्या वर कुठे जगशील....

अशा शब्दांत त्याने हे हिंदी मच्छर रॅप गायलंय.

यशराजने पोस्ट करताच त्याच्या या साँगला पाच मिलीयनहून अधिक व्ह्यूज आलेत तर एक लाखाहून अधिक लाईक्स मिळालेत. यशराज त्यांच्या क्रिएटिव्हीटीसाठी सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. त्याने त्याच्या क्रिएटिव्हीटीच्या जोरावर अनेक बड्या कालाकारांसह काम केलंय. एका यूजरने त्याच्या रॅपवर फार विनोदी कमेंट केली आहे. तुझ्या गाण्याच्या तालावर मच्छरही थिरकत असतील अशी ही कमेंट होती. (Music)