
सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. सहसा लोक हातांनी विटा किंवा जड वस्तू उचलतात, परंतु या व्हिडिओमध्ये एका आजोबांनी जे केले ते खरोखरच धक्कादायक आहे. त्यांनी पायाच्या बोटांनी एक वीट उचलली आणि तोल सांभाळत उभे राहिले. त्यांचे अनोखे टॅलेंच पाहून लोक थक्क झाले आहेत आणि व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होऊ लागला आहे.