
देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु आहे. पुराच्या पाण्यात अनेक लोक वाहून गेल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अतिधाडस दाखणवण्याच्या नादात अनेक लोक पाण्यात वाहून गेल्याचा घटना समोर आल्या आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. लडाखमधील प्रसिद्ध पेंगॉंग तलावाजवळ एक रायडर बाईकसह वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.