VIDEO : मोदी म्हणाले, दोन मित्र शिकारीला गेले; काँग्रेस म्हणालं, "मोदी-अदानी!" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi PM Narendra Modi
VIDEO : मोदी म्हणाले, दोन मित्र शिकारीला गेले; काँग्रेस म्हणालं, "मोदी-अदानी!"

VIDEO : मोदी म्हणाले, दोन मित्र शिकारीला गेले; काँग्रेस म्हणालं, "मोदी-अदानी!"

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चांगलंच गाजत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच मोदी एकदा भाषण करत असताना अचानक काँग्रेसने घोषणाबाजी सुरू केली.

या घटनेचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी मोदींचे संबंध असल्याचा आरोप करत त्यांना काही प्रश्नांची उत्तरं मागितली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका करणं सुरू केलं आहे.

अद्याप पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली नाहीत, अशी टीका सातत्याने केली जात आहे. अशातच पंतप्रधान मोदींच्या भाषणातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी भाषणात म्हणत होते, "एकदा दोन तरुण जंगलात शिकारीला गेले होते." तेवढ्यात मागून काँग्रेस नेते ओरडले, "तुम्ही आणि अदानी का?"

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रेसनेही आपल्या विविध ट्वीटर हँडलवरुन शेअर केला आहे.