
Viral vat purnima story of husband and wife: हिंदू धर्मात वट पौर्णिमेला खुप महत्व आहे. विवाहित महिला या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. वट पोर्णिमा हा सण महिलांसाठी खुप खास असतो.या दिवशी पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थन करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. काल (१० जून) ला राज्यात वट पौर्णिमेचा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. अनेकांना महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करतांचे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर केले आहेत. पण सध्या सोशल मिडियावर एक भावनिक करणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पतीने मोठ्या आनंदात वट पौर्णिमा साजरी केली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव देखील केला आहे.