Viral Video : तिकिटासाठी 'पठान' चा फॅन ढसाढसा रडला; म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathan

Viral Video : तिकिटासाठी 'पठान' चा फॅन ढसाढसा रडला; म्हणाला...

Pathan Movie : किंग खान शाहरुखचा मोस्ट अवेटेड चित्रपट पठाण लवकरच रिलीज होणार आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Fresh Air : शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! अडीच हजार द्या, शेतात मोकळा श्वास घ्या!

जसजशी या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत आहे तसतशी चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयीची क्रेझ अधिक वाढत आहे.

त्यात अनेकांनी हा चित्रपट फर्स्ट डे फस्ट शो बघण्यासाठी आतापासूनच बुकिंग सुरू केली आहे. काहींना तिकिट मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, तर, काहींचा हिरमोड झाला आहे.

हेही वाचा: Ambani Family Video : अंबांनीचं 'हम आपके है कौन'; 'वाह वाह रामजी' वर कुटुंब झिंगाट

दरम्यान, चित्रपट रिलीजपूर्वी शाहरूखच्या डायहार्ट फॅनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये चाहता म्हणत आहे की, 'जर मी पठाण चित्रपट पाहू शकलो नाही आणि शाहरुख खानला भेटू शकलो नाही, तर 25 तारखेला मी माझ्या मागे दिसणाऱ्या याच तलावात उडी मारून जीवन संपवेल.

शाहरुखला भेटून पठाण चित्रपट पाहण्याचे माझे एकच स्वप्न आहे, पण पैशांमुळे मला पठाण चित्रपटाचं तिकिट काढता येत नाहीये असेही तो सांगत आहे. यासाठी मला कुणी मदत करत करा अशी विनंती करताना दिसत आहे.

हेही वाचा: Google Laysoff 2023 : गुगलच्या पॅरेंट कंपनीतून १२ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

पठान चित्रपटाच्या माध्यमातून किंग खान तब्बल ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर येत आहे. याआधी २०२८ मध्ये शाहरुख खान आनंद एम. रॉय यांच्या 'झिरो' चित्रपटात दिसला होता.

पठान चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरूनही मोठा वाद झाला होता. त्यानंतर आता येत्या २५ जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.