
Women Argument with TTE Hurl Casteist Remarks Railway Station Viral Video
esakal
Trending Video : रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या दोन महिलांनी टीटीईवर जातीवाचक टोमणे मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने रेल्वे प्रवासातील नियमांचा भंग आणि सामाजिक वर्तनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.घटना रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्यात घडली, जिथे टीटीईने दोन महिलांना तिकीट दाखवण्यास सांगितले. एका महिलेने आपली मुलगी सोबत असताना टीटीईला उलट उत्तर दिले आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगवर आक्षेप घेतला.