

Supriya Sule dance video at Yugendra Pawar wedding
Sakal
Pawar family wedding viral moments: युगेंद्र पवार यांचा विवाहसोहळा ३० नोव्हेंबरला मुंबईतील वांद्र-कुर्ला संकुलातील जिओ सेंटरमध्ये उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. युगेंद्र यांनी तनिष्का कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली. युगेंद्र पवार यांची वरात अत्यंत धूमधक्यात आली होती. यावेळी युगेंद्र पवारांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी जबरदस्त डान्स केला होता. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.