

A viral video shows passengers rushing a collapsed man on a luggage trolley at Ujjain Railway Station after he suffered a heart attack while boarding a train.
esakal
मध्यप्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र उज्जैनच्या रेल्वे स्टेशनवर हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महाकालचे दर्शन घेऊन उज्जैनहून परतणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी उज्जैन रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढत असताना तो अचानक प्लॅटफॉर्मवर कोसळला. टीसीने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. स्टेशनवर स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी त्याला सामानाच्या ट्रॉलीवर ठेवले उपचारासाठी हलवले, पणरुग्णालयात उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.