
पत्नीने पतील भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांचे रस्त्यात भांडण झाले पण बिचारा पती पत्नीचा मार आणि टोमणेही खात राहिला. महिला तिच्या पतीला थपडा लगावत राहिली, त्याने विरोध केला पण त्याचे काही चालले नाही. गर्दीतील कोणीही तिला थांबवले नाही. सगळे हा तमाशा बघत होते. काहींनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.