Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

Viral Video : एका महिलेने प्रसूतीकळा सुरू असताना रुग्णालयाच्या गेटवरच मोटारसायकलवर बाळाला जन्म दिला. व्हिडिओमध्ये पती, नर्सेस आणि नवजात बाळाची काळजी घेतानाचे दृश्य दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्सकडून भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.
A woman gives birth to a baby on a motorcycle outside a hospital

A woman gives birth to a baby on a motorcycle outside a hospital

esakal

Updated on

आई होणे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. बाळाचा जन्म हा एक अत्यंत खास क्षण असतो हा असा एकमेव प्रसंग आहे जेव्हा बाळ रडत असताना आईच्या चेहऱ्यावर हास्य असते. मात्र, बाळंतपणाचा अनुभव प्रत्येक महिलेसाठी सारखाच असतो असे नाही. सध्या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रसूतीकळा सुरू असताना रुग्णालयात पोहोचलेल्या एका महिलेने थेट मोटारसायकलवरच बाळाला जन्म दिल्याचे दिसून येते. हा आश्चर्यकारक पण हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत आणि सर्वजण आई व बाळ दोघांच्याही सुरक्षिततेसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com