
एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका युवकाला बाईक चालवत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कटघर पोलिस स्टेशन हद्दीतील पाचपेडा परिसरात घडली आणि ही संपूर्ण घटना तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.