Viral Video: अरे याला कोणी फिल्मफेयर द्या रे! तरूणाचा माधुरी फिवर बघून नेटकरी हैराण

व्हिडीओमध्ये नेमकी माधुरी बोलतेय की हा तरूण असा प्रश्न अनेकांना पडला. हा भन्नाट व्हिडीओ तुम्हीही एकदा बघायलाच हवा
Viral Video
Viral Videoesakal

Viral News Video: देवदास चित्रपट हा एखाद्याने बघितला नसेल असे क्वचितच होईल. शाहरूख खान, माधुरी दिक्षित, ऐश्वर्या राय यांचा २००२ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही आयडियल मूव्हीच्या लिस्टमध्ये बसतो. यातील प्रत्येक कलाकाराची भूमिक उल्लेखनिय होती. नुकताच माधुरीचे डायलॉग म्हणणाऱ्या एका तरूणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नेमकी माधुरी बोलतेय की हा तरूण, असा प्रश्न अनेकांना पडला. हा भन्नाट व्हिडीओ तुम्हीही एकदा बघायलाच हवा.

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा माधुरी दिक्षितच्या डायलॉगमध्ये न थांबता बोलतो. (Viral Video) भन्नाट व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हा तरूण सोफ्यावर बसलेला असतो. आणि माधुरीच्या ज्या डायलॉगवर तो बोलतो तेच डायलॉग्ज तो न थांबता म्हणत असतो. त्यामुळे एकदाचा चाहत्यांनाही प्रश्न पडतो की नेमकं कोण बोलतोय. व्हिडीओमधील माधुरी की तो तरूण? त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच भन्नाट व्हायरल झालाय.

या व्हिडीओला सोशल मीडियावर एका लाखाहून अधिक व्ह्यूज आले असून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. एकाने 'मस्त' तर दुसऱ्याने 'याला ही एक फिल्मफेयर द्या' असेही म्हटले आहे. त्याचा हा व्हिडीओ काहीसा कॉमेडी आणि काहीसा गंभीर वाटतो. नेटकऱ्यांना या तरूणाची मिमिक्री कला मात्र आवडलेली दिसते. या कारणाने हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com