
Chhatrapati Shivaji Maharaj: १६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज १२,००० पायदळ आणि २४,००० घोडदळासह हैदराबादजवळ पोहोचले. त्यांच्या या भव्य आगमनाने हैदराबाद शहरात आणि डच ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीत भीतीचे वातावरण पसरले. डचांना त्यांच्या वखारी आणि मालाला धोका निर्माण होण्याची सतत भीती वाटत होती. या काळात शिवाजी महाराजांचा दरारा इतका होता की, त्यांच्या आगमनाची बातमी येताच सर्वत्र खळबळ उडाली.