वतन बेच कर पंडित नेहरू फूले नहीं समाते हैं…’, जेव्हा ही  कविता इंदिरा गांधी अन पंडित नेहरुसमोर कवीने म्हटली तेव्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indira Gandhi and Pandit Nehru

वतन बेच कर पंडित नेहरू फूले नहीं समाते हैं…’, जेव्हा ही  कविता इंदिरा गांधी अन पंडित नेहरुसमोर कवीने म्हटली तेव्हा...

नेहरूंचे लहान मुलांवर जीवापाड प्रेम होते. लहान मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून हाक मारीत. नेहरूंनी आपल्या कारकिर्दीत लहान मुलांच्या कल्याणासाठी खूप कार्य केले, म्हणूनच 1964 साली नेहरूंच्या मृत्यूनंतर 14 नोव्हेंबर ही नेहरूंची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

आज सोशल मिडियावर आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयीच्या वेगवेगळ्या पोस्ट सोशल मिडियावर वायरल होतांना दिसत आहे. काही पोस्ट मध्ये यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव होत आहे, तर काही पोस्ट मधून लोक नेहरूवर टिका देखील करतांना दिसत आहे.

आज असा एक आपल्या देशातील प्रसिद्ध हिंदी कवी कुमार विश्वास यांचा चार वर्षे जुना व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुमार विश्वास पंडित नेहरु यांच्याविषयी एक गोष्ट सांगताना दिसत आहेत. ही गोष्ट नेहरुजीचे नेमके व्यक्तिमहत्व कसे होते हे सांगण्यास थोडी मदत करणारी आहे. सोबतच आजचे राजकारण आणि तेव्हाचे राजकारण यातील फरकावर सुध्दा ते आपल्या कवितेतून भाष्य करत आहे.

पुढे व्हिडीओमध्ये कुमार विश्वास सांगतात की नेहरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात देशभरातील असंख्य कवि एकत्र आले होते. तेव्हा कवी नागार्जुन हे सुध्दा तिथे उपस्थित होते. तेव्हा इंदिरा गांधी यांनी नागार्जुन यांना एक कविता सुनाओ असा आग्रह केला.

तेव्हा नागार्जुन इंदिराजीङना म्हणाले कि, तुमचे पिताश्री माझी कविता ऐकू शकणार नाही. तेव्हा इंदिरा गांधी बोलल्या की तुम्ही कविता तर सुरु करा,ऐकतील आपोआप सगळेजण कविता...

नंतर लगेच नागार्जुन यांनी भरलेल्या मैफलीत आपली कविता सादर केली. कवितेच्या ओळी अशा होत्या की,‘वतन बेच कर पंडित नेहरू फूले नहीं समाते हैं, फिर भी गांधी की समाधि पर झुक झुक फूल चढ़ाते हैं’. अशी ती कविता होती.

कुमार विश्वास व्हिडीओमध्ये शेवटी बोलतात की, खूप मोठी गोष्ट की नेहरूंनी ही कविता ऐकल्यानंतर असे नाही म्हटले की यांच्या घरी ED किंवा CBI चौकशी नाही पाठली.