Noodles Making : नूडल्स बनवण्याची प्रक्रिया उडवेल झोप! खायचे की नाही हे Video पाहूनच ठरवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Noodles Making

Noodles Making : नूडल्स बनवण्याची प्रक्रिया उडवेल झोप! खायचे की नाही हे Video पाहूनच ठरवा

आपण नूडल्स खाता? आपण जरी नूडल्स खात नसाल तरी आपल्या मित्रांपैकी अनेकजण नूडल्स खात असतील. तर अशा सर्वांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नूडल्स कसे बनतात माहितीये? नूडल्स बनवण्याची पद्धत पाहून आपला विश्वास उडेल आणि परत आयुष्यात तुम्ही नूडल्सकडे ढुंकूनही पाहणार नाहीत.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

चिराग भरजाट्या यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्ही रस्त्याच्या कडेचा असलेल्या चायनीडजच्या गाडीवर शेवटचा शेजवान सॉससोबत चायनीज हक्का नूडल्स कधी खाल्ले होते? असा सवाल त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना केला आहे. तर नूडल्स बनवण्याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिमध्ये दाखवली आहे.

दरम्यान, या कारखान्यात काम करणारे लोकं, नूडल्स तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तू आणि मोकळ्या जमीनीवर त्यांना टाकताना पाहून आपली नूडल्स खाण्याची इच्छा कायमची उडून जाईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :food culturenoodles day