Video : वाढदिवस ठरला शेवटचा..! केक कापताना घडली भयंकर घटना, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल..

Video Birthday celebration goes wrong due to sparkler candle fire : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडलेला धक्कादायक अपघात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Video Birthday celebration goes wrong due to sparkler candle fireesakal
Updated on
  • वाढदिवस साजरा करताना निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो.

  • स्पार्कल कॅण्डल व फेस स्प्रे यांचा एकत्र वापर अत्यंत धोकादायक ठरतो.

  • सेलिब्रेशन करताना सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे.

Viral Video : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि आनंदाचा क्षण असतो. मित्रमंडळी, केक, पार्टी आणि सेलिब्रेशन हे सगळं एकत्र आलं की क्षण अविस्मरणीय बनतो. पण कधी कधी या आनंदाच्या क्षणात थोडासा बेधडकपणा जीवावर बेतू शकतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाचा वाढदिवस थोडक्यात त्याच्या जीवनाचा शेवटचा दिवस झाला असता

काय घडलं नेमकं?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना दिसतो. केक कापण्यापूर्वी आनंदाच्या भरात त्याने केकवर लावलेली स्पार्कल कॅण्डल हातात घेतली आणि ती जळवून डोक्याजवळ फिरवू लागला. त्याच क्षणी उपस्थित एका व्यक्तीने त्याच्या दिशेने स्नो स्प्रे फवारला. हा फवारलेला फेस त्याच्या केसांवर आणि चेहऱ्यावर बसला आणि त्याचवेळी स्पार्कल कॅण्डलमधून निघालेली आग या फेसला लागली.

क्षणार्धात त्याच्या केसांनी पेट घेतला. तो हादरून गेला आणि तात्काळ बाजूला उभ्या असलेल्या दोन महिलांनी प्रसंगावधान राखत त्याच्या केसांची आग विझवली. सुदैवाने वेळेवर मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली, पण हा प्रसंग किती धोकादायक ठरू शकतो, याची प्रचीती सर्वांना आली.

Viral Video
Video : दगडाच्या काळजाची आई! चार वर्षांच्या चिमुकलीला उलथनं तुटेपर्यंत मारहाण, नरड्यावर पाय देऊन उभी राहिली; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

@u/flukerecords या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला लाखोंनी पाहिलं असून, अनेकांनी आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. नेटकऱ्यांनी अति उत्साहातून केलेल्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. “स्पार्कल कॅण्डल आणि स्प्रे एकत्र वापरणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं”, “अशा अपघातांबद्दल सतत ऐकूनही लोक का खबरदारी घेत नाहीत?”, “डिस्क्लेमर असतो तो फक्त शोभेसाठी का?” अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली आल्या आहेत.

Viral Video
Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

वाढदिवस असो वा कोणतंही सेलिब्रेशन सुरक्षितता नेहमी प्रथम असली पाहिजे. स्पार्कल कॅण्डल्स, फायरवर्क्स किंवा इतर ज्वलनशील साहित्य वापरताना खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्नो स्प्रे, फेस स्प्रे यामध्ये असलेले रसायन ज्वलनशील असतात हे लक्षात ठेवायला हवं.

हा व्हिडीओ पाहून सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे क्षणिक आनंदासाठी जीव धोक्यात घालणं कधीच शहाणपणाचं ठरत नाही.

FAQs

  1. व्हिडीओत नेमकं काय घडलं?
    वाढदिवस साजरा करताना स्पार्कल कॅण्डल आणि फेस स्प्रेमुळे केसांना आग लागली.

  2. या घटनेत कुणी जखमी झालं का?
    सुदैवाने वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अपघात टळला आणि कोणीही गंभीर जखमी झालं नाही.

  3. ही घटना कोठे घडली?
    व्हिडीओमध्ये ठिकाण स्पष्ट नाही, पण तो @u/flukerecords या इन्स्टाग्रामवरून शेअर झाला आहे.

  4. यातून काय शिकायला मिळतं?
    कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com