
एका डॉक्टराला हॉस्पिटलमध्येच विठोबाचं दर्शन झालं.
आषाढी एकादशीपूर्वीचा भावनिक व्हिडीओ सर्वत्र पसरला आहे.
"सेवेतच देव आहे" ही भावना या घटनेतून ठळकपणे दिसून येते.
Viral Video : "श्रद्धा असेल तर विठ्ठल कोणत्याही रूपात दर्शन देतो" ही एक वाक्य नुसती म्हण नसून, लाखो वारकऱ्यांच्या अनुभवांमधून पुन्हा पुन्हा सिद्ध होत आलेली एक श्रद्धा आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला, अशाच एका हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगाने अनेकांच्या भावना भारावल्या.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका डॉक्टरने अनुभवलेलं विठ्ठलदर्शन अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणतं आहे. आषाढी वारीला जाण्याची इच्छा मनात असूनही, आपलं वैद्यकीय कर्तव्य बाजूला ठेवू न शकणाऱ्या एका डॉक्टरला, विठ्ठलाने थेट हॉस्पिटलमध्येच दर्शन दिलं.
एका सरकारी रुग्णालयात ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांनी आपला अनुभव शेअर करताना सांगितलं "वारी चुकली, पण विठ्ठल मात्र भेटलाच!" या डॉक्टरांनी सेवेत असताना एका वयोवृद्ध रुग्णाची सेवा करत असताना अनुभवलेली भावना शब्दांत मांडली. हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले ते आजोबा कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात टाळ अगदी वारकऱ्याच्या रुपात. त्या आजोबांची सेवा करत असताना डॉक्टरच्या मनात क्षणभर विचार आला "हा तर विठ्ठलच आहे."
ते पुढे म्हणतात, "माफ कर विठ्ठला, वारी जरी चुकली तरी या वारकऱ्यांची अशी सेवा मी आयुष्यभर करत राहीन."
आज ५ जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. आषाढी एकादशीसाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना पंढरपूरमध्ये भाविकांचा महासागर उसळला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठीची रांग थेट गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे.
वारीत तरुण, वृद्ध, महिला, लहानग्यांपासून ते वृद्ध आजी-आजोबांपर्यंत सगळे विठ्ठलनामाच्या गजरात, अभंगात आणि भक्तिभावाने सहभागी झाले आहेत. मात्र काहीजण असेही आहेत जे कामामुळे वारीत सहभागी होऊ शकत नाहीत. अशाच एका डॉक्टरसारख्यांसाठी हा व्हिडीओ एक भावनिक अनुभव ठरतो.
संत सावता माळी म्हणतात, "माळी काम करी, विठ्ठल स्मरी." याचा अर्थ म्हणजे, आपल्या कामात रमल्यास आणि त्या सेवेतच देव पाहिला, तर देव भेटतोच. हेच या डॉक्टरांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून अनुभवले. या प्रसंगातून स्पष्ट होतं देव फक्त मंदिरात, मूर्तीत नाही तर तो माणसांमध्ये, त्यांच्या दयाळूपणात, सेवाभावी वृत्तीत आणि प्रेमात असतो.
या व्हिडीओमध्ये केवळ एक दृश्य दिसत नाही, तर ती एक भावना आहे निष्ठा, समर्पण, आणि श्रद्धेची. ज्यांना वारीला जाता आलं नाही, त्यांना हा अनुभव आठवण करून देतो की, "विठ्ठल कोणत्याही रूपात येतो."
हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी आलं नाही, असं होणं शक्य नाही. कारण हा केवळ विठ्ठलदर्शनाचा क्षण नाही, तर "कर्तव्य आणि श्रद्धेचा संगम" आहे.
१: व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विठोबाचं दर्शन कोणी अनुभवले?
एका डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्येच विठोबाचं दर्शन अनुभवले.
२: आषाढी एकादशी २०२५ पूर्वी हा व्हिडीओ का व्हायरल झाला आहे?
वारी चुकलेल्या डॉक्टरांना विठोबाने रुग्णाच्या रूपात दर्शन दिल्याने लोक भावूक झाले.
३: यामधून काय मुख्य संदेश मिळतो?
श्रद्धा असेल तर विठोबा कोणत्याही रूपात दर्शन देतो, हे यातून स्पष्ट होतं.
४: व्हिडीओमध्ये डॉक्टरांनी कोणती भावनिक प्रतिक्रिया दिली?
"वारी चुकली पण सेवा करताना विठोबा भेटला" असे डॉक्टरांनी नम्रपणे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.